कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर, ता.बागलाण, जि.नाशिक
आजचे बाजारभाव

कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर, ता.बागलाण, जि.नाशिक

 


नामपूर बाजार समितीची ओळख,

                               नियमित केलेल्या शेतीमालाचा विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूरची स्थापना ३० एप्रिल २०१५ रोजी झाली प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली नामपूर मुख्यआवार ४.० हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारलेला आहे तसेच करंजाड उप बाजाराची स्थापना ३१/१२/२०१८ रोजी झाली . व १०.०हेक्टर मध्ये विस्तारलेला आहे तसेच त्या ठिकाणी अद्याप कामकाज  सुरु आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूरची स्थापना महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन ) अधिनियमन १९६३ मधील तरतुदी नुसार झालेली आहे . बाजार समितीचा मुळ उद्देश  शेतकऱ्यांना  शेतीमाल खरेदी - विक्री व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित  करणे व अनुषंगाने गरजा पूर्ण करणे त्याच बरोबर  शेतकऱ्याच्या शेतीमालाची विक्री व्यव्सथापन  निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळणे  देणे हा आहे . 
                             कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथे शेतीमालाचे पहिले वजन होते ते बाजार समितीने विकसित केलेले  BANTOSH  AAP  वर घेतले  जाते त्यावेळी शेतकऱ्याचा मोबईल नंबर घेतला जातो व त्यानंतर लिलाव  झाल्यानंतर BANTOSH  AAP मध्ये बाजार भाव  भरल्यानंतर बाजार भावाचे msg  संबंधीत शेतकऱ्यांना जातात त्यामुळे लिलावाच्या वेळी शेतकरी हजर नसले तरी त्यांना बाजार भाव घरी बसल्या कळतात .